

The Beginning of
SWASTI-CHINHE
‘बृहत्तर भारत’ हा शब्द MA Indology ला प्रवेश घेतल्यावर पहिल्यांदा ऐकला. चाळीशी उलटल्यावर. मला इतिहासाची, विशेषकरून भारतीय इतिहासाची आवड असून सुद्धा, मी कधीही आग्नेय आशियाई देशातील भारतीय संस्कृती बद्दल ऐकले नव्हते. हे पुस्तक लिहिन्याचे कारण हेच ठरले …
नंतर मी अधिकाधिक वाचत गेले तसे मला एक मोठे दालनच उघडल्यासारखे वाटले … जिथे पहावे तिथे भारतीय संस्कृतीच्या खुणा दिसायला लागल्या. भारतीय भाषा, धर्म, देवता, कला, वस्त्र, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, पंचांग, स्थापत्य, कथा, काव्य, छंद, तंत्रज्ञान, रामायण, महाभारत …
मला जसे MA ला प्रवेश घेऊन, हे शिकावे लागले (आणि भाग्याने हे मिळाले) तसे प्रत्येकाला मिळेलच असे नाही. आणि म्हणून या पुस्तकाचा प्रपंच! हे ज्ञान केवळ अभ्यासकांसाठी कुठल्याशा संदर्भ ग्रंथांमध्ये वाचनालयात असू नयेत. सामान्य वाचकाला याची ओळख असावी .. म्हणून हे पुस्तक.
हे पुस्तक वाचून बृहत्तर भारताच्या पसाऱ्याची कल्पना येईल. भारतीय संस्कृतीच्या व्याप्तीची कल्पना येईल. इतिहासाचा अनेकपदरी पट उलगडतांना आपले पूर्वज कोण होते व त्यांचे कर्तृत्व काय होते ते कळेल. त्या मधून आपली ‘तत्त्वमसि’ ओळख जागृत होईल. आणि आपल्यावर ‘भारतीय’पणाच्या विषयी लादल्या गेलेल्या न्यूनगंडाचे खोटे आवरण फाटून जाईल.
Talks On स्वस्तिचिन्हे
What You Will Discover




Logo of Ganesha University, Indonesia.
River Me Kong or Ma Ganga, Thailand.
Saraswati Devi from Tibet and Buddha from Japan.
Discover how Textile, Shipping, Metallurgy industries; Zero and Calculus; Surgery and Medicine; stories and games travelled from India to the World.
What Scholars Say
व्यासंगी लेखिका दीपाली पाटवदकर हिच्या ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ या पुस्तकातून भाषा, संस्कृती, ज्ञान-विज्ञान यांचा प्रवाह भारतातून संपूर्ण जगभर कसा जाऊन पोचला याचे सप्रमाण विवेचन दिले आहे.
आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे.

– अभिजित जोग
ज्येष्ठ लेखक, डावी वाळवी
आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृतीची स्वस्तीचिन्ह पावलोपावली दिसतात. तेथील आचार विचार, रितीरिवाजावर भारतीय संस्कृतीचा ठसा आहे. हे ठसे विनाशकारी नव्हते तर मंगलमय होते. भारताने जगाला काय काय दिले, याचा अभ्यास करताना आपण काय हरवलं याचीही नोंद ठेवली पाहिजे. आपण पूर्वी महान होतो, हा अभिमान मानून थांबता कामा नये, तर आपल्या देशाचा विस्तार कमी कमी का होत गेला, याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि इथून पुढे सतर्क राहिले पाहिजे. धडा घेतला पाहिजे.

– शेफाली वैद्य
लेखिका, स्तंभलेखक आणि माध्यम व्यक्तिमत्त्व
देशविदेशातील हिंदू तीर्थस्थळे आपल्या संस्कृतीच्या जगभर पसरलेल्या पाउलखुणा वाचणे ही एक आनंदाची पर्वणी! ही संस्कृती बहरली तिला लोकांनी आपलीशी केली, शाश्वत होती, time tested होती म्हणून. ह्या पाउलखुणा विध्वंसक नाहीत, तर जगामध्ये भर टाकणाऱ्या, रचनात्मक आहेत. संस्कृतीच्या चहूदिशांना पसरलेल्या ह्या पाउलखुणांचा मागोवा घेण्याचं खूप मोठं काम लेखिका दीपाली पाटवदकरने “देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे” ह्या तिच्या नव्या पुस्तकाद्वारे केलं आहे.

– विभावरी बिडवे
लेखिका, निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा
आज “देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे” या नवीन पुस्तकाचा आपल्याला परिचय करून देताना एक भारतीय म्हणून मला अभिमान वाटतोय! आपल्यालाही हे पुस्तक वाचून निश्चित आनंद मिळेल याची खात्री देतो!
भारतीय लोकं जिथे जिथे गेले तेथे त्यांनी आपल्या कल्याणकारी संस्कृतीची छाप पाडली.जगाच्या कल्याणाची आणि मांगल्याची कामना करणाऱ्या संस्कृतीने सदैव भवतू सब्ब मंगलम् आणि सर्वे भवंतू सुखिना: याचाच उद्घोष केला…आणि आपल्या मागे ठेवल्या आपल्या कल्याणकारी संस्कृतीच्या पाऊलखुणा!
– रावजी लुटे
ज्ञानसाधना पुस्तकालय, संचालक
Explore other books




