भारतीय ज्ञान परंपरा – १४ विद्या

|

कैक रूढी, चालीरीती परंपरागत चालत आलेल्या असतात. त्या कुठेही लिहून ठेवलेल्या नसतात. ग्रथित केलेल्या नसतात. काही पारंपारिक ज्ञान मात्र सूत्र रूपाने, सिद्धांत रूपाने ग्रथित केले आहे. त्या ग्रंथांमधून विविध शास्त्र, विज्ञान किंवा तत्त्वज्ञान सांगितले आहे. या ग्रंथबद्ध ज्ञानाला ‘भारतीय ज्ञान संस्था’ (Indian Knowledge System) असे म्हटले जाते. ही ज्ञान परंपरा अतिशय प्राचीन आहे. आणि तिचा ओघ अखंड वाहत आहे. अशा ज्ञान परंपरा इतरही प्राचीन संस्कृतींमध्ये होत्या. जसे इजिप्त, सुमेरियन, ग्रीक, बेबिलोनियन, पर्शियन इत्यादी. मात्र त्या परंपरा काळाच्या ओघात व आक्रमणांच्या माऱ्यात नष्ट झाल्या. भारतीय ज्ञान परंपरा मात्र अनेक आघात सहन करून सुद्धा आजही टिकून आहे. त्या अर्थी त्यामध्ये निश्चितपणे काही शाश्वत असे तत्त्व असणार. तसे नसते तर ते ज्ञान हजारो वर्ष टिकले नसते. ते ज्ञान टिकले तर आहेच पण विशेष असे की ते आजही वाचावेसे वाटते. त्या अर्थी ते नित्यनूतन आहे. प्रत्येक वाचनात त्यामधील काही नवीन अर्थ कळतो.

४ वेद

भारतीय ज्ञानाचा आवाका पाहतांना आपण सुरुवात करतो ती वैदिक वाङ्मयापासून. याला ‘श्रुती’ वाङ्मय पण म्हटले जाते. त्याचे कारण असे की हे वाङ्मय लेखन व वाचनासाठी नाही, तर पठण व श्रवणासाठी आहे. हा मौखिक ज्ञानाचा ठेवा गुरु-शिष्य परंपरेने वेगवेगळ्या पद्धतीने गायन करून, पठण करून जपून ठेवला. जटा, रेखा, दंड, शिखा, घन आदि विविध प्रकारे वैदिक मंत्रांच्या पाठांतराच्या पद्धती विकसित केल्या होत्या. हे मंत्र व ऋचा कवीने ‘रचलेल्या’ नाहीत. तर ते मंत्र ऋषींना ‘दिसले’ व तसे त्याने गायले. ऋषी या मंत्रांचे कर्तृत्व स्वत:कडे घेत नाहीत. या कारणास्तव वेदांना ‘अपौरुषेय’ पण म्हणतात. वेदांचे अजून एक विशेष असे आहे, की ते जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार वेद असून प्रत्येकात चार प्रकारचे वांग्मय आहे – संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. प्रत्येक वेदाच्या अनेक संहिता आहेत. प्रत्येक संहितेत अनेक मंडळे, अनुवाक किंवा कांड आहेत. त्यात प्रत्येकात अनेक सूक्त आहेत. प्रत्येक सूक्तात अनेक मंत्र आहेत. आणि प्रत्येक मंत्राचे वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावले आहेत! अनेक ब्राह्मण ग्रंथातून वैदिक संहितेचा विस्तार आला आहे. कथा आल्या आहेत. आणि वेदतील तत्त्वज्ञान उपनिषदांमधून आले आहे.

कर्मकांडसंहितामुलमंत्र व सुक्त. प्रत्येक सुक्ताला एक देवता, एक छंद व एक ऋषी associated असतात.
ब्राह्मणया ग्रंथात यज्ञातील विधी कसे करायचे याची माहिती मिळते. हा यज्ञ पूर्वी कोणी केला, का केला व त्याला काय फळ मिळाले या बद्दलच्या कथा व आख्याने देखील ब्राह्मण ग्रंथात वाचावयास मिळतात. ब्राह्मण वाक्य १० प्रकारची आहेत – हेतू: (का करायचे), निर्वाचन (etymology), निंदा (का करायचे नाही), प्रशंसा (का करायचे), संशयो (confusion असेल तर काय करायचे), विधी (instructions), परक्रिया (आणखी कोणी केला त्याची कथा), पुराकल्प (पूर्वी कोणी केला त्याची कथा), व्यावधारणकल्पना (काळ व संख्या) व उपमान (उपमा देणे)
उपासनाकांडआरण्यकअरण्यात जाऊन केलेले चिंतन, या ग्रंथात तत्वज्ञान रूपात पाहायला मिळते. इथे कर्मकांड सोडून ज्ञानकांडाकडे वाटचाल सुरु होते. काही वेदात अरण्यके दिसत नाहीत, तिथे कदाचित उपनिषदांपर्यंत जाण्यासाठी मधल्या पायरीची गरज भासली नसावी.
ज्ञानकांडउपनिषदया मध्ये वेदांचे मुख्य तत्त्वज्ञान येते. गुरूंच्या जवळ, पायाशी बसून शिकणे अपेक्षित. केवळ अविद्येत रमलेल्या मानवाला विद्येच्या रस्त्याने नेऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणे, हा उपनिषदांचा हेतू आहे. ज्याला विद्येची तहान आहे, तोच हे शिकण्यास पात्र आहे. येथे वर्ण – जाती – स्त्री – पुरुष असा भेदभाव नाही.
उपनिषदांची संख्या ५०० पर्यंत सांगितली जाते. पैकी १० प्रमुख आहेत – ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड, मांडुक्य, तैत्तरीय, छांदोग्य, ऐतरीय, बृहदारण्यक

६ वेदांग

वेद कळण्यासाठी लिहिलेल्या साहित्याला वेदांग म्हटले आहे. वेदतील उच्चार, शब्दांचे अर्थ, वाक्यरचना, काव्यरचना, तसेच यज्ञ कसे आणि कधी करायचे हे सांगणारे साहित्य म्हणजे वेदांग.

शिक्षाउच्चारण शास्त्र. (Phonetics and Phonology).
पाणिनीय शिक्षा, स्वरव्यंजन शिक्षा, भारद्वाज शिक्षा, नारदीय शिक्षा, याज्ञवाल्क्य शिक्षा आदि ३५ शिक्षा ग्रंथ उपलब्ध असून, त्या पैकी पाणिनीय शिक्षा सर्वात प्राचीन आहे. त्या पूर्वीचे शिक्षा ग्रंथ उपलब्ध नाहीत.
इतर ग्रंथ जसे – वर्णरत्नप्रदीपिका, केशवी शिक्षा, स्वरांकन शिक्षा, स्वरभक्ति लक्षण शिक्षा ईत्यादी.
शिक्षांच्या आधारावर, प्रत्येक शाखानिहाय प्रातिशाख्य ग्रंथ तयार झाले. वेदपाठच्या उच्चारणासंबधी नियम यामध्ये येतात. ऋक् प्रातिशाख्य, तैत्तरीय प्रातिशाख्य, वाजसनेय प्रातिशाख्य, अथर्व प्रातिशाख्य, शौनकीय प्रातिशाख्य आदि, त्या त्या वेदाचे उच्चारण नियम देतात. जसे –
* ऋक् प्रातिशाख्य – दोन स्वरांमध्ये ‘ड’ आला तर त्याचा ‘ळ’ होतो. उदा. अग्निमीळे
* तैत्तरीय प्रातिशाख्य – र, श, स, ष, ग, ह च्या आधी अनुस्वार आला तर त्याचा ‘ग’ उच्चार होतो. ष चा ‘ख’ होतो.
* वाजसनेय प्रातिशाख्य – र, श, स, ष, ग, ह च्या आधी अनुस्वार आला तर त्याचा ‘गुं’ उच्चार होतो.

शिक्षाचे सहा अंग आहेत
* वर्ण – ५२ वर्ण स्वर
* मात्रा – ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत बल
* उच्चारण स्थान – कंठय, ओषटय, दंत्य etc.
* साम – शुद्ध उच्चार संतान
* संधी – सूर्य + उदय = सूर्योदय
व्याकरणभाषेचे नियम सांगणारे ग्रंथ. पाणिनीचा अष्टाध्यायी हा ग्रंथ ४००० सूत्रात संस्कृतचे व्याकरण सांगतो.
पाणिनीने या मध्ये आधीच्या १२ ग्रंथाचे संदर्भ दिले आहेत. मात्र ते ग्रंथ आता उपलब्ध नाहीत.
कल्पवैदिक धर्माच्या कर्मकांडाच्या ज्ञानासाठी ही सूत्रे उपयुक्त आहेत. या मध्ये प्रत्येक वेदाशी निगडीत –
* गृह्यसूत्रे – घरगुती यज्ञ. संस्कारांसाठीचे होम. गृह्याग्नीवर करावयाचे छोटे यज्ञ.
* श्रौतसूत्रे – वैदिक यज्ञ, श्रौताग्नी वर करावयाचे यज्ञ.
* धर्मसूत्रे – समाजात वावरण्याचे नियम
* शुल्बसूत्रे – यज्ञकुंडांच्या बांधकामाबद्दलचे नियम. भूमितीचे fundamentals येतात.
छंदवेदांतील मंत्र ज्या छंदांमध्ये बद्ध केले आहेत, त्या छंदांबद्दलचे शास्त्र. वेदातील जास्तीत जास्त वापरलेलं गेलेले छंद आहेत – गायत्री, अनुष्टुप आणि त्रिष्टुप. पिंगलाचे छंदशास्त्र हा ग्रंथ छंदांची उकल करून सांगतो.
निरुक्तया ग्रंथामध्ये शब्दांचे मूळ (Etymology) व त्यावरून त्याचा अर्थ सांगितला आहे. यास्काचार्यांचा निरुक्त ग्रंथ.
ज्योतिषयज्ञ कोणत्या वेळेला करावेत हे कळण्यासाठी सूत्रे.
देश, काल, आणि दिशा ज्याला समजते, तोच वेद समजू शकतो.
लगधाचे वेदांग ज्योतिष, अथर्वण ज्योतिष आदि ग्रंथ उपलब्ध आहेत.
संहिताऋग्वेदकृष्ण यजुर्वेद शुक्ल यजुर्वेद सामवेदअथर्ववेद
संहिताशाकल, बाष्कलतैत्तिरीय (आपस्तंब), मैत्रायणी, काठक, कठ – कापिष्ठलकाण्व, माध्यंदिनकौथुम, राणायनीय, जैमिनीयपिप्पलाद, शौनक
ब्राह्मणऐतेरीय, कौषीतकी, शांखायनतैत्तिरीयशतपथतांड्य, आर्षेय, वंश, देवताध्याय, सामविधान, संहीतोपनिषद, तलवकार, जैमिनीय , जैमिनीयार्षेय, जैमिनीयोपनिषदगोपथ, गोपथ
आरण्यकऐतेरीय, शांखायनतैत्तिरीय, मैत्रायणीबृहदारण्यक
उपनिषदऐतेरीय, कौषीतकी, बाष्कलतैत्तिरीय, मैत्रायणीय, कठ, श्वेताश्वरईशावास्य, बृहदारण्यकछांदोग्य, केनप्रश्न, मांडुक्य, मुंडक
श्रौतसूत्रेशांखायन, आश्वलायनआपस्तम्ब, हिरण्यकेशी, बौधायन, भारद्वाज, मानव, वैखानस कात्यायनमशक, लाटायन, जैमिनीय, राणायनीय वैतायन
गृह्यसूत्रेशांखायन, आश्वलायन, शाम्बव्यआपस्तम्ब, हिरण्यकेशी, बौधायन, भारद्वाज, मानव, वैखानस, काठकपारस्करगोभील, खदिरकौशिक
धर्मसूत्रेवशिष्ठआपस्तम्ब, हिरण्यकेशी, बौधायन, भारद्वाज, मानव, वैखानसविष्णुगौतम
शुल्बसूत्रेआपस्तम्ब, बौधायन, मानवकात्यायन

दर्शने

वेद शब्द प्रमाण मानणारे ६ दर्शने आहेत  – सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा. या दर्शनांचा पण वैदिक साहित्यात समावेश होतो.

वेदांग व दर्शने सूत्ररुपात संक्षिप्तपणे लिहिली आहेत. सूत्रे ही कमीतकमी शब्दात रचलेली असल्याने कळायला अवघड असतात. त्यामुळे त्यांचे विवरण करून त्यावर भाष्य लिहिणे पुढील काळात आवश्यक झाले. उदाहरण घ्यायचे झाले तर – दहा उपनिषदांवर आदि शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहेत. किंवा ब्रह्मसूत्रावर कैक तत्त्वचिंतकांनी भाष्य लिहिले आहे. जसे आदि शंकरांचे शारीरकभाष्य, रामानुजंचे श्रीभाष्य, वल्लभाचार्यांचे अणुभाष्य. आपापल्या द्वैत, अद्वैत आदी मतानुसार लिहिलेली ही भाष्ये आहेत. अशा प्रकारचे भाष्य साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

धर्मशास्त्र आणि स्मृती

ऋषींनी सांगितलेले ज्ञान लक्षात ठेवून, आठवून लिहिले म्हणून त्यांना ‘स्मृती’ ग्रंथ म्हटले जाते.

धर्माचे नियम ह्या ग्रंथांमधून दिले आहेत.

इतिहास

इतिहास, अर्थात ‘हे असे घडले’ सांगणारे ग्रंथ आहेत – रामायण व महाभारत.

पुराण

पुराणांमधून प्राचीन काळी घडलेल्या गोष्टींची माहिती येते. कालानुरूप पुराणांमध्ये नवी नवी माहिती लिहिली गेली. कैक पुराणात अगदी १९ व्या शतकात देखील माहिती लिहिली आहे.

महाभारतकार व्यास म्हणतात – वेद कळण्यासाठी इतिहास व पुराणे वाचावीत. कारण त्यामधून वेदांनी जे प्रतिपादित केले आहे तेच अधिक सोपे करून कथा रूपाने सांगितले आहे.

Leave a comment