“दारू म्हणजे काय रे भाऊ?”
“अरे! दारू हे एक मादक पेय असते. जे प्याले असता, बरे का, मनुष्याला सकाळी काय बोललो ते दुपारी आठवत नाही. दुपारी काय बोललो ते संध्याकाळी आठवत नाही. ते प्याले असता मनुष्य लोकांना मारहाण करतो. त्या पेयाला दारू असे म्हणतात.”
पुलंच्या दोन भावांमधील संवादाच्या धरती वर “AIT म्हणजे काय रे भाऊ?” हा दोन भावांच्या मधील संवाद.
छोटा भाऊ – AIT म्हणजे काय रे भाऊ?
मोठा भाऊ – अरेSS! AIT म्हणजे Aryan Invasion Theory, हा किनई एक सिद्धांत आहे.
छोटा – सिद्धांत म्हणजे रे काय असते भाऊ?
मोठा – सिद्धांत म्हणजे, बरे का, कल्पना किंवा अटकळ, ज्याने एखाद्या घटनेचे स्पष्टीकरण देता येते. जसे – डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत किंवा विश्वाची उत्पत्ती सांगणारी Big Bang Theory हा सुद्धा एक सिद्धांत आहे. कधी कधी अधिक संशोधनानंतर काही सिद्धांत रद्द करावे लागले आहेत, जसे – Dalton’s Atomic Theory, किंवा सूर्य विश्वाचे केंद्र आहे असे सांगणारा Heliocentric Universe चा सिद्धांत नवीन माहिती पुढे आल्यावर रद्द केले गेले.

छोटा – असे होय! भाऊ रे, हा AIT चा सिद्धांत काय सांगतो?
मोठा – अरे! हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत भारतात दोन प्रकारच्या भाषेचे गट का आहेत हे सांगायचा प्रयत्न करतो. त्यानुसार उत्तरेतील ‘आर्य भाषिक’ आणि दक्षिणेतील ‘द्रविड भाषिक’ लोक हे दोन वेगळे लोक आहेत. उत्तरेतील आर्य भाषा युरोपियन भाषांसारखी असल्याने, ‘आर्य’ बाहेरून भारतात आले असा हा सिद्धांत मांडला.
छोटा – दादा, हे विचित्रच आहे! भारतात द्रविड भाषा तयार होऊ शकते, पण ‘आर्य’ भाषा तयार होऊ शकत नाही! हा कसला तर्क आहे? ‘आर्य भाषिक’ लोक बाहेरचे होते हे कशावरून ठरवले?
मोठा – त्याच काय आहे छुटक्या, बायबल मध्ये लिहिले आहे की नोहाची ३ मुले मेसोपोटोमिया मधून जगभर पसरली. मग त्यांच्या वंशजांना अर्थात इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्यांना युरोप मध्ये आणि भारतात आणणे गरजेचे होते. [१३] म्हणून इस पूर्व १२५० च्या दरम्यान या इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या आर्यांना गंगेच्या खोऱ्यात आणले. या टोळ्या संस्कृत भाषा आणि ‘caste system’ घेऊन आल्या. पुढच्या हजार एक वर्षात त्यांनी वेद वगैरे लिहून टाकले.
छोटा – मग इस पूर्व १२५० च्या आधी भारतात कोण राहत होते?
मोठा – अरे, त्यावेळी गंगेच्या खोऱ्यात द्रविड भाषिक आदिमानवांच्या टोळ्या राहत होत्या. एकदम मागास! त्यांना दक्षिणेला हाकलून आर्य भाषिक गंगेच्या खोऱ्यात स्थिरावले. (इस १८७६ चा सिद्धांत)
छोटा – ओह! पण भाऊ रे! ते मोहनजोदाडो आणि हरप्पा मध्ये उत्खनन झाले. आणि तिथे इस पूर्व ३००० पासूनची प्रगत संस्कृती मिळाली. मग? (इस १९२२ मध्ये)
मोठा – हो ना! ती तर गडबड झाली. आता आर्य आक्रमणाचा सिद्धांत बदललायला हवा. हम्म! मग आपण असे म्हणू की – पूर्वीच्या काळी किनई द्रविड लोकं सिंधूच्या खोऱ्यात राहत होते. त्यांच्याकडे साधे रथ आणि घोडे नव्हते! माहितय? मग काय! इस पूर्व १५०० दरम्यान, त्या मागासलेल्या द्रविडांवर प्रगत आर्यांनी आक्रमण केले. तिथल्या मूलनिवासी द्रविडांना दक्षिणेला हाकलून दिले आणि आर्य लोक उत्तर भारतात स्थाईक झाले.
छोटा – आत्ता तर द्रविड गंगेच्या खोऱ्यात राहत होते ना? आणि ते आर्य इस पूर्व १२५० मध्ये आले होते न? कसला हा सिद्धांत!! थत्त! काही सांगतोस! जाऊदे. हे आर्य भाषिक लोक म्हणे इस पूर्व १५०० मध्ये का आले? त्या आधी का नाही येऊ शकले?
मोठा – काय आहे ना, बायबल मध्ये लिहिले आहे कि इस पूर्व ४,००० मध्ये पृथ्वी तयार झाली. त्यानंतर आदम -एव्ह, नोहाच्या वेळची जगबुडी, मोसेस वगैरे घडायला आणि सोबतच आर्य टोळ्यांना आगीचा शोध लावण्यात, चाकाचा शोध लावून रथ तयार करण्यात, घोडे वगैरे पाळून त्यांना रथाला जुंपण्यात किमान दोन अडीच हजार वर्ष तरी गेली असतील. तोपर्यंत इस. पूर्व १५०० हे साल उजाडले होतं. मग निघाले ते रथात बसून फिरायला! म्हणून त्या आधी शक्य नव्हतं. कळले का?
छोटा – पण, भाऊ! आम्हाला तर शाळेत शिकवले की पृथ्वी ४.५ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली! हा सिद्धांत तयार करणाऱ्यांच्या समजुतीमध्ये फारच घोटाळे आहेत रे भाऊ!
मोठा – जा बुवा! तुला दुसरं काहीतरी विचारायचं असेल तर विचार.
छोटा – भाऊ, हे आर्य लोक ‘आ S क्र S म S ण S’ म्हणत द्रविडांशी युद्ध केले का रे?
मोठा – हो तर! मोहनजोदाडोच्या उत्खननात ३७ सांगाडे एके ठिकाणी विखुरलेले सापडले होते. त्या वरून सर मोर्टीमर व्हीलर यांनी सांगितले की हेच ते द्रविड ज्यांना आर्य टोळ्यांनी मारले, हाकलले आणि येथील गावांवर कब्जा मिळवला. [१६]
छोटा – पण दादा, नंतर या सांगाड्यांचा अभ्यास करून असे दाखवले की उत्खननात सापडलेले सांगाडे वेगवेगळ्या काळातले होते. आणि ते हल्ल्यात वगैरे मारले गेले नव्हते, तर बुडून मेले असावेत. (इस १९६५)
मोठा – अरेच्चा! थोडास घोळ झाला बहुतेक. काय आहे, तसे युद्धाचे काहीच पुरावे सापडले नाहीत. आपण AIT मध्ये बदल करू. असे म्हणू की – हे आर्य घोडे जुंपलेल्या वेगवान रथातून, बायका-पोरांना, म्हाताऱ्या-कोताऱ्याना घेऊन भारतात आले. युद्ध वगैरे काही केले नाही.
छोटा – छ्या! मग ह्याला कसलं ‘आक्रमण’ म्हणायचं? हे तर स्थलांतर झाले.
मोठा – हम्म! तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण सिद्धांताचे नाव बदलून टाकू! आपण त्याला ‘आक्रमण’च्या ऐवजी ‘स्थलांतर’ केले असे म्हणू. Aryan Migration Theory!
छोटा – पण तुला माहितय का भाऊ? MtDNA म्हणजे आईकडून येणाऱ्या Mitochondrial DNA चा अभ्यास केला असता असे कळते की भारतीय स्त्री हिच येथील लोकांची आई आहे, बाहेरची स्त्री नाही.
मोठा – असे आहे होय? थांब थांब! आपण सिद्धांतात अजून एक बदल करू. असे म्हणू की स्थलांतर करून येणारे फक्त पुरुष होते. त्यांच्या तांड्यामध्ये बायका नव्हत्या. तसही हे त्यांना पितृसत्ताक ठरवण्यासाठी नंतर सोयीचे पडेल. [१०]
छोटा – ऑं? अरे भाऊ पण सिंधू ही त्या काळात जगातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेली वसाहत होती. त्या वसाहतीतील लोकांना हाकलून लावायला, ज्या मोठ्या संख्येने पुरुष यायला हवे, तेवढे तरुण पुरुष दुसऱ्या कुठल्या वसाहतीत होते का?
मोठा – फारच अणुकुचीदार प्रश्न आहे बुवा हा. थांब, मला परत एकदा सिद्धांत बदलू दे. असे म्हणू की, शेकडो वर्ष आर्य पुरुषांच्या टोळ्यांच्या लाटा येत होत्या. Migration in waves.
छोटा – भाऊ, असा कसा रे हा तुझा सिद्धांत, प्रश्ना प्रश्नाला बदलणारा? बर, मला सांग, आर्यांनी आल्यावर काय केले?
मोठा – भक्कम तटबंदी असलेल्या अनेक आटपाट नगरातील कित्येक लाख द्रविडांना हाकलून लावले.
छोटा – भाऊ रे! तटबंदी असलेली आटपाट नगर बांधणारे स्थानिक लोकं ‘मागास’ आणि भटके आर्य ‘प्रगत’ रे कसे?
मोठा – आता आली का पंचाईत?! जाऊ दे आपण परत सिद्धांत बदलू. आर्य प्रगत नव्हते. ते रानटी लोक होते आणि द्रविड प्रगत होते असे आपण म्हणू. ok? मग तर ठीक आहे?
छोटा – फारच लवचिक आहे बुवा हा सिद्धांत! असो. त्या रानटी आर्यांची तर चैनच झाली. उन, वारा, पाउस, वादळ सोसत; नदी, नाले, डोंगर, दऱ्या ओलांडत भटकत होते बिचारे, पण इथे आल्यावर त्यांना राहायला आयत्याच well planned cities आणि ready possession घरे मिळाली!
मोठा – क्लॅक! नाही काई! आर्य तिथे राहिलेच नाहीत मुळी! द्रविड निघून गेल्यावर सगळी गावे ओस पडली.
छोटा – ऑ!! मग आर्य गेले कुठे?
मोठा – मी तर आता बुचकळ्यातच पडलो बुवा!
छोटा – बरे, ते ही जाऊ दे! भाऊ, मला सांग, जर द्रविड दक्षिणेला गेले, तर त्या आधीच दक्षिणेत रहात असलेल्या लोकांना त्यांनी कुठे हाकलून दिले?
मोठा – जा बुवा! तू तर फारच प्रश्न विचारतोस!
छोटा – बरे तर मग! राहू देत तो प्रश्न! हे आर्य कोणत्या मार्गाने आले रे भाऊ?
मोठा – ते किनाई मध्य आशिया मधून इतरत्र गेले. काही टोळ्या इराण मध्ये गेल्या. काही टोळ्या युरोप मध्ये. आणि काही टोळ्या दक्षिणेकडे हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतात आल्या.
छोटा – अबबबब! म्हणजे AIT हा जागतिक प्रश्न झाला की रे भाऊ! युरोप आणि इराण मधील मूलनिवासींना या आर्यांनी कुठे हाकलून लावले? या आक्रमणाने अन्यायग्रस्त झालेले इराणी आणि युरोपचे मूलनिवासी आज त्या विरुद्ध आवाज उठवतात काय?
मोठा – छे! छे! अरे पर्शिया आणि युरोप मध्ये आर्यांच्या स्थलांतरामुळे तेथील मूलनिवासी विरुद्ध आर्य असा प्रश्न उद्भवलाच नाही!
छोटा – मग इराण आणि युरोप मध्ये आर्यांनी आणलेल्या ‘caste system’ मुळे प्रश्न निर्माण झाले असतील नाई?
मोठा – नाही रे, आर्यांनी त्यांची ‘caste system’ फक्त भारतात आणली. इतरत्र कुठे नाही नेली!
छोटा – अच्छा अच्छा! म्हणजे caste मुळे आणि भाषेमुळे फक्त भारतीयांचे विभाजन केले? आणि ते सुद्धा ब्रिटीश आल्यावरच आपल्यात असे विभाजन होते हे कळले! असो. भाऊ मला सांग, रथ तर मैदानी प्रदेशाचे वाहन आहे. हिंदूकुशचा भला मोठा पर्वतमय प्रदेश आर्यांनी रथातून कसा काय पार केला?
मोठा – छे बुवा! अशा प्रश्नाचे उत्तर आम्ही देत नाही. असा प्रश्न विचारणाऱ्याला आम्ही सरळ ‘हिंदुत्ववादी’ म्हणतो!
छोटा – बर मग ते ही राहू दे. आले समजू ते कसेतरी त्यांचे रथ घेऊन. पण मला सांग सिनौली गावात इस पूर्व २,००० मधील रथांचे अवशेष मिळाले आहेत. रथाच्या आकारावरून आणि रचनेवरून कळते की त्या रथांना घोडे जुंपले होते. म्हणजे आर्य यायच्या आधीच इथे रथ आणि घोडे दोन्ही होते. मग? [४]
मोठा – काय आहे, हा सिनौलीच्या रथांना आम्ही तर बुवा बैलगाडी म्हणतो! [16]
छोटा – अरे, पण त्या गाडीच्या आकारावरून तो रथ दिसतो आणि जूची लांबी दाखवते की तो घोड्याने ओढला गेला होता.
मोठा – पण छुटक्या, सिंधू संस्कृतीच्या एकाही मुद्रेवर घोड्याचे चित्र मिळाले नाहीये. म्हणजे त्यांना घोडा माहित नव्हता हे सिद्धच होते!
छोटा – त्यांच्या मुद्रांवर गायीचे चित्र पण नाही. झालंच कुत्रा, मांजर यांचेही चित्र मुद्रेवर नाही. मग त्यांना हे प्राणी माहित नव्हते असे म्हणायचे का? असो! मग, आर्यांनी पुढे काय केलं?
मोठा – पुढच्या एक हजार वर्षात, बुद्धाचा जन्म होईपर्यंत या आर्यांनी – संस्कृत भाषा विकसित केली. ४ वेदांच्या शेकडो शाखा, कित्येक उपनिषदे, ६ शास्त्रे, कितीतरी सूत्र ग्रंथ, व्याकरण, छंद, ज्योतिष वगैरे काय काय रचले. मौखिक परंपरा जपण्यासाठी, पाठांतराच्या विविध पद्धती तयार केल्या, आणि सगळं ज्ञान कंठस्थ करून ठेवले.
छोटा – भारीच की! हे भटके लोक एकदम सुसंस्कृतच झाले म्हणायचे! रानटीपणा सोडून – काव्य, गायन, तत्त्वज्ञान वगैरे करायची उपरती त्यांना कशी काय झाली? आणि ते सुद्धा फक्त १,००० वर्षात? कसं रे जमलं त्यांना भाऊ? कारण या सगळ्या साहित्याच्या तुलनेने अति लहान असलेले हिब्रू बायबल लिहायला १,५०० वर्ष लागली होती.
मोठा – फारच बुवा तुझ्या शंका! त्यांनी हे सगळं सरस्वती नदीच्या काठावर बसून लिहिले. ती ज्ञानदेवता त्यांना पावली असेल असे म्हण, हवे तर मिस्टर हिंदुत्ववादी ! मग तर झालं?
छोटा – पण भाऊ! सरस्वती नदी तर इस पूर्व १५०० च्या कितीतरी आधी म्हणजे AIT नुसार आर्य यायच्या आधीच वाळून गेली होती! मग त्या कोरड्या नदीच्या काठावर बसून, आर्यांनी का बरे सरस्वती नदीचे गोडवे गायले?
मोठा – तू नको नको ते प्रश्न विचारतोस बुवा. ते सोड! भारतीयांच्या DNA मध्ये R1a haplogroup मिळतो ते काय उगीच का? आर्य भारतात आल्याचा तो भक्कम पुरावा आहे.
छोटा – रे भाऊ! आर्य सिद्धांतानुसार R1a फक्त उच्च वर्णीय नागरी लोकांत मिळायला हवा. पण R1a उच्च वर्णीयच नाही तर, AIT ज्यांना ‘मूलनिवासी’ म्हणते त्या वनवासी, द्रविड, दलित सर्वांमध्ये मिळतो.
मोठा – छे बुवा! मी तर तुझ्या पुढे अगदी हातच टेकले! AIT ने सांगितले आहे की – DNA मध्ये R1a असलेले आर्य, संस्कृत भाषा घेऊन आले. कळले?
छोटा – अरे, भाषेचा आणि DNA चा काय संबंध? आता तू इंग्रजी बोलतो ते काय तुझ्या DNA मध्ये आहे का?!
मोठा – पण, पण त्या राखीगढीच्या DNA मध्ये R1a सापडला नाही, त्याचे काय? सांग ना काय त्याचे?
छोटा – राखीगढीचा सांगाडा स्त्रीचा होता! त्यात R1a कसा असणार? आणि R1a भारतातून बाहेर गेला नाही कशावरून? [५][६] कारण त्याच पेपर मध्ये ११ भारतीयांचे सांगाडे इराण आणि तुर्कमेनिस्तान मधील प्राचीन कबरीत मिळाले आहेत. [१४] म्हणजे बाहेरून भारतात नाही, तर भारतातून बाहेर जाण्याचा पुरावा मिळाला आहे.
मोठा – छे बुवा! आता कसं सांगू तुला, AIT म्हणजे काय ते?
छोटा – थांब, आता मीच सांगतो! AIT असा सिद्धांत आहे, जो वाचला असता, बरे का, भारतीय लोकांना सवर्ण-दलित, उच्च-नीच, आर्य-द्रविड, उत्तरेचे-दक्षिणेचे, परदेशी-मूलनिवासी, नागरी-वनवासी, नाकेले-नकटे, गोरे-काळे अशा कोणत्याही दोन विरुद्ध गटात टाकून त्यांच्यात द्वेष निर्माण करता येतो, त्या सिद्धांताला AIT असे म्हणतात!
मोठा – वा रे वा! आला मोठा Nationalistic कुठला! साफ चूक आहे हे!
छोटा – बरे तर! दुसरी व्याख्या सांगतो – AIT असा सिद्धांत आहे, जो वाचल्याने मनुष्याला चित्रविचित्र भास होऊ लागतात. आणि तो भ्रमिष्टासारखे – “भारतात ऐतिहासिक काळात झालेली इस्लामी व युरोपियन आक्रमणे आर्यांच्या कथित आक्रमणांच्या तुलनेत अगदीच किरकोळ होती! औरंगझेब, टिपू सुलतान, तैमुर, खिलजी, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज वगैरे मंडळी त्या हिंस्र आर्यांपुढे मनीमऊच्या पिल्लांसारखी गोंडस होती!” असे बरळू लागतो, त्या सिद्धांताला AIT असे म्हणतात! [११]
मोठा – अरे जा, जा छुटक्या! तुझे मत कोण ऐकून घेणारय? तू थोडी माझ्यासारखा intellectual आहेस? [१२]. आम्ही तुला कुठल्या कॉन्फेरेंसला बोलावणार नाही. तू पेपर लिहिलास तर तो छापणार नाही. छापला तर त्याची दाखल घेणार नाही. तुझी कुठल्या विद्यापीठात नेमणूक करणार नाही. तरीही असेच बोलत राहिलास तर तुझी जागतिक पातळीवर निंदा करू. मग काय करशील?!! [१२]
छोटा – अरे! तू जर खरा intellectual असशील तर, तू त्या सिद्धांताकडे डोळसपणे पाहून चुका दुरुस्त करशील!
मोठा – वाह! म्हणजे आता तू इतिहास दुरुस्त करणार काय रे! Rightist कुणीकडचा! [१२]
छोटा – अरेSSS! भावाभावात भांडणे लावणारा हा सिद्धांत निव्वळ कल्पनेचा खेळ आहे असे तूच सुरुवातीला म्हणलेस ना?
किती दिवस तू “छोट्या भावाला कोंड्यावर विकत घेतलंय” अशा बालिश बाता मारणार आहेस? किती दिवस मला खोटेच सांगणार आहेस की, “तुझे बापजादे चोर होते, लुटारू होते, टोळक्याने फिरत इथे आले.” असल्या भूलथापांना मी जन्मभर फसेन असे तुला कसे वाटले? अरे, मी पण आता मोठा झालोय, कळले का? तुझ्या काल्पनिक आरोपात काही एक तथ्य नाही हे मला आता चांगलंच कळून चुकलंय!
तू पण मोठा हो. ते AIT चे हाड चघळायचे सोड! तो खोटारडा सिद्धांत फेकून दे आणि चल माझ्याबरोबर खेळायला!
संदर्भ –
- Harappan site of Rakhigarhi: DNA study finds no Central Asian trace, junks Aryan invasion theory. – Economic Times, 13 June 2018
- Genetic study dismisses Aryan invasion as myth – Times of India, Mirror (Pune), Jul 06 2015
- New research debunks Aryan invasion theory – DNAIndia – 10 Dec 2011
- Sanauli Find Challenges Aryan Invasion Theory and Could Re-write Indian History – Ancient Origins, 23 June 2018
- “The genetic component which spread beyond India is significantly higher in India than in any other part of world. This implies that this genetic component originated in India and then spread to West Asia and Caucasus,” said Gyaneshwar Chaube of University of Tartu, Estonia. – India Today, 10 Dec, 2011
- Genetics Might Be Settling The Aryan Migration Debate, But Not How Left-Liberals Believe – by Anil Kumar Suri
- … the origin of the R1a is far from settled …
- … it is almost certainly the case – tribal communities with high proportions of R1a assimilated into the caste matrix over the millennia. So how correct is it to link the R1a with an Indo-European migration?
- Genetics and the Aryan invasion debate – Koenraad Elst, June 2017.
- Propagandizing the Aryan Invasion Debate: A Rebuttal to Tony Joseph – A. L. Chavda
- … The westward Indo-Aryan expansion is a plausible explanation for the male-mediated demic expansions of R1a1a (R-M17) into Europe beginning around 2,500 BCE, which, to a large extent, replaced indigenous European males and their Y-chromosome strata. It also explains R1a1a’s diversification into the European R1a-Z282 and Asian R1a-Z93 branches….
- … large number of ancient Harappan DNA samples need to be tested…
- The Climate Change and the Environmental basis for the Human migrations during Holocene. Dr. P. Priyadarshi, MD, FRCP Edin, 16 July 2016
- … Up to 6000 BC, Europe was inhabited by dark skinned meat-eating hunters, who were nearly completely replaced by the arriving light-skinned Asians…
- … The mtDNA of the southern Indian locations have ultimately spread all over India and have even migrated to Europe during the Iron Age….
- How genetics is settling the Aryan migration debate – Tony Joseph, The Hindu, 16 June 2017
- … there was strong sex bias in Bronze Age migrations. In other words, those who migrated were predominantly male …
- 4500-year-old DNA from Rakhigarhi reveals evidence that will unsettle Hindutva nationalists – Kai Friese
- … AIT is of an entirely more impressive order than the relatively inconsequential Islamic or European colonial invasions …
- … India is composed of a large number of small populations …
- Lies, deception and character assassination: Aryan invasion propaganda touches new low – Abhijit Chavda 7, Sep 2018
- Orientalism and the Puzzle of the Aryan Invasion Theory – Marianne Keppens and Jakob De Roover
- … the idea of one common source for all languages, related to one original people, was embedded in ‘the biblical version of history, in which Noah’s three sons, Japhet, Shem and Ham, were generally accepted as being the progenitors of the whole of humanity’. Before Babel, there was ‘one human race speaking one language’, which was then divided and dispersed over the earth. ‘This theme, even when stripped of its biblical trappings, was to remain thoroughly imprinted in European consciousness until well into the twentieth century’….
- Science Magazine paper – The formation of human populations in South and Central Asia – V. Narsimhan et al.
- Cell paper – An Ancient Harappan Genome Lacks Ancestry from Steppe Pastoralists or Iranian Farmers – Dr Vasant Shinde et al.
- THE MYTHICAL MASSACRE AT MOHENJO-DARO – George F. Dales
- Putting the horse before the cart: What the discovery of 4,000-year-old ‘chariot’ in UP signifies – Shoaib Daniyal, Jun 14, 2018, scroll.in

Leave a comment