
व्यासंगी लेखिका दीपाली पाटवदकर हिच्या ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ या पुस्तकातून भाषा, संस्कृती, ज्ञान-विज्ञान यांचा प्रवाह भारतातून संपूर्ण जगभर कसा जाऊन पोचला याचे सप्रमाण विवेचन दिले आहे. आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे.
– अभिजित जोग, लेखक
आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृतीची स्वस्तीचिन्ह पावलोपावली दिसतात. तेथील आचार विचार, रितीरिवाजावर भारतीय संस्कृतीचा ठसा आहे. हे ठसे विनाशकारी नव्हते तर मंगलमय होते. भारताने जगाला काय काय दिले, याचा अभ्यास करताना आपण काय हरवलं याचीही नोंद ठेवली पाहिजे. आपण पूर्वी महान होतो, हा अभिमान मानून थांबता कामा नये, तर आपल्या देशाचा विस्तार कमी कमी का होत गेला, याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि इथून पुढे सतर्क राहिले पाहिजे. धडा घेतला पाहिजे.आपला वारसा का आक्रसला याचा अभ्यास करून तसे पुन्हा होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.
– शेफाली वैद्य, पुणे
देशविदेशातील हिंदू तीर्थस्थळे आपल्या संस्कृतीच्या जगभर पसरलेल्या पाउलखुणा वाचणे ही एक आनंदाची पर्वणी! ही संस्कृती बहरली ती तिला लोकांनी आपलीशी केली, शाश्वत होती, time tested होती म्हणून. जिथे जिथे भारतीयांनी प्रवास केला तिथे तिथे तिनेही प्रवास केला आणि तेथील लोकांनी ती आत्मसात केली. म्हणूनच तिच्या पाउलखुणा आजही जगभरात सर्वत्र दिसतात. ह्या पाउलखुणा विध्वंसक नाहीत, तर जगामध्ये भर टाकणाऱ्या, रचनात्मक आहेत. त्या जीवनातील सृजनशीलतेला, आयुष्याच्या रसरशीतपणाला वाढवणाऱ्या आणि त्या सर्वेश्वर जगतव्यापी, परमोच्च शक्तीबरोबर सर्वांना एकरूप करणाऱ्या आहेत. संस्कृतीच्या चहूदिशांना पसरलेल्या ह्या पाउलखुणांचा मागोवा घेण्याचं खूप मोठं काम लेखिका दीपाली पाटवदकरने “देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे” ह्या तिच्या नव्या पुस्तकाद्वारे केलं आहे.
– विभावरी बिडवे, लेखक
आज “देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे” या नवीन पुस्तकाचा आपल्याला परिचय करून देताना एक भारतीय म्हणून मला अभिमान वाटतोय! आपल्यालाही हे पुस्तक वाचून निश्चित आनंद मिळेल याची खात्री देतो!
भारतीय लोकं जिथे जिथे गेले तेथे त्यांनी आपल्या कल्याणकारी संस्कृतीची छाप पाडली.जगाच्या कल्याणाची आणि मांगल्याची कामना करणाऱ्या संस्कृतीने सदैव भवतू सब्ब मंगलम् आणि सर्वे भवंतू सुखिना: याचाच उद्घोष केला…आणि आपल्या मागे ठेवल्या आपल्या कल्याणकारी संस्कृतीच्या पाऊलखुणा!
– रावजी लुटे, लातूर
ही कहाणी आहे, भारतीय देव, धर्म, भाषा, शब्द,लिपी, ग्रंथ, कथा, काव्य पंचाग, गणित, विज्ञान, कला आदी जगभर पसरलेल्या भारतीय संस्कृतीच्या स्वस्तिचिन्हांची! पुस्तकाचा अनुक्रम पाहून ही आपल्याला पुस्तकाची उंची समजून येईल!
अनुक्रम
१. वायव्यशल्य: सप्तसिंधू संस्कृती, मिरपुर खासाचा ब्रह्म, कराचीचा वरुण, मुलतानाचा नरसिंह, मुलतानाचा आदित्य,तक्षशिला नगरी, पुष्कलावती नगरी, गोरख टीला, लाहोरचे शिल्पकार, राजा दहीहराची संतान, फाळणीच्या आधीचे सिंध, बलूचिस्तानची बंदरे,बलूचिस्तानचे वाळवंट, बलूचिस्तानचे दैवत, गांधार देश, बामियानचा बुद्ध, काबूल आणि झाबुल, काफिरीस्थान, अफ पाक वांशिकाता आणि संस्कृती
२. उत्तरकुरू: बाहलिक देश, सोगडीया, उत्तर कुरु
३. ईशान्यसूत्र: चीन: रेशीम महामार्ग,भारतीय शांतीदूत, कुमारजीव, बोधिधर्म, ब्राह्मण पंडित, चीनचे विद्यार्थी, चीन मधील मंदिरे, गुंफा व मूर्ती
कोरिया: भिक्षू योमचोक, कोरियन भिक्षू जियोमिक, राजकुमारी सुरीरत्ना
जपान: बौद्ध धर्म, बुद्धमूर्ती, गुरू शिष्य शुआन झांग आणि दोश्शो, बाँझी, जपान वैदिक देवता
तिबेट: तिबेटीयन लिपीचा नमुना, मुघलांचे वंशज
४. पूर्वामित्र: जनकभूमी नेपाळ, नेपाळकन्या, बंगाल, पूर्व पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश
५. आग्नेयपुराण: गंगेच्या पलीकडचा भारत, अगस्ती ऋषी, आग्नेयेतील भारतीय, कौंडिन्य, कंबू स्वयंभू, कौंडिन्य दुसरा, आणखीही इतर, आग्नेय देशातील साहित्य, आग्नेय देशातील मंदिरे, प्रसाद शिखोरफुम,थायलंड, जावा, बोरबदुर जावा, अँकर वाट, कंबोडिया, वाट फाऊ लाओस, माय सोन मंदिर, व्हिएतनाम, आग्नेय आशियातील मंदिर जीर्णोद्धार व व्यवस्था, आग्नेय देशातील कला.
६. दक्षिणद्वीप: मालाद्वीप, लक्षद्वीप, पाचुचे बेट , श्रीलंका, साता समुद्र पार – गुलाम ते राष्ट्रपती (मॉरिशस)
७. पश्चिमगाथा: पर्शिया जणू भारताचा जुळा भाऊ, मोसोपोटेमिया मध्ये सरस्वती सिंधूचे व्यापारी, तुर्कस्तान मध्ये इंद्र ,मित्र आणि वरुण, मितांनी, कसाइट्स, हिटाइट्स, असुरांचा देश, ग्रीक आणि वैदिक देवतांमधील साम्य, दानवांच्या देशात, रोमानी, आझरबैजालचे ज्वाला मंदिर, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पश्चिमेला प्रवास, वस्त्रोद्योगाच्या हरण, कथा साहित्याचा प्रवास, इस्लामच्या सुवर्ण युगात संस्कृत ग्रंथाचे भाषांतर, भारत के युरोप वाया अरेबिया, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाची लूट, भारतीय पारंपरिक ज्ञानाची चोरी.
– रावजी लुटे, लातूर
