
हरि अनंत हरिकथा अनंता! लोकांच्या पिढ्या काळाच्या पडद्यावर येतील आणि जातील, परंतु कालजयी रामकथा शाश्वत आहे. रामकथेच्या दिग्विजयाची गोष्ट सांगणारे पुस्तक – ‘रामकथामाला’ नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
– मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
दिपाली पाटवदकर ह्यांनी ‘रामकथामाला’ ह्या पुस्तकरूपाने ह्या सर्व रामायण अभिव्यक्तीचा परिचय करून देणारे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. ह्या मध्ये विविध रामायणावरील निरुपण आणि सोबत रंगीत प्रसिद्ध चित्रे, शिल्पांची चित्रे ह्यांनी नटलेले हे पुस्तक आहे. रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारे हे पुस्तक, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले असून, या पुस्तकाला श्री निलेश नीलकंठ ओक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
दिपालीचं पुस्तक केवळ माहिती न राहता एक स्वतंत्र तात्त्विक भूमिकाही मांडतं कारण त्यामध्ये प्रत्येक रूपाचं वैशिष्ट्य आणि फरकही आहे. जरूर संग्रही असावे असे पुस्तक, फोरकलरमध्ये असूनही अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे.
– मुंबई तरुण भारत
रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारे हे पुस्तक आहे. रामकथा ही केवळ भारतातच नाही, तर अनेक देशात प्रिय आहे. अनेक देशातून ही कथा सांगितली जाते – तिबेट, चीन, मोंगोलियापासून इंडोनेशिया आणि फिलिपिन्सपर्यंत. शेकडो वर्ष देशोदेशीच्या लाखो लेखकांना, कलाकारांना रामायणातील सत्य, मांगल्य आणि सौंदर्य खुणावत आहे. तेच त्यांनी आपापल्या कलेमध्ये टिपायचा प्रयत्न केला आहे. असे रामकथा सांगणारे अनके लेख, कला, शिल्प, चित्र या पुस्तकातून लेखिका दिपाली पाटवदकरांनी मांडले आहेत.
– महाराष्ट्र टाईम्स
